Monday, April 8, 2019

लोकसभेच्या उमेदवाराकडून स्टॅम्प पेपरवर अश्वासनं

निवडणूक म्हटलं की आश्वासनं आलीच. ती देताना गुळगुळीत आणि रंगीत कागदावर केलेली सुबक छपाई आणि बड्या बड्या नेत्यांचे छायाचित्रं हे ओघानंच आलं. या नेहमीच्या सवयीच्या 'जाहीरनाम्यां'च्या गर्दीत कोऱ्या कागदावर टाईप केलेला मजकूर कुणी निवडणूक जाहीरनामा म्हणून पुढ्यात ठेवला तर? आणि तोच मजकूर मुद्रांकावर अर्थात स्टॅम्प पेपरवर टाईप केलेला असला तर?

दुर्मिळच ना हे? आहे तरी कोण ही व्यक्ती?

होय, घडलंय तसं.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराने अशा प्रकारचा 'वचननामा' सादर केलाय. शंभर रुपयांच्या मुद्रांकावर रीतसर शासकीय अधिकाऱ्याच्या समोर तो  नोंदवून घेतलाय. कदाचित, भारतीय सार्वत्रिक निवडणुकांच्या  इतिहासातील पहिलीच घटना असावी ही! या उमेदवाराचं नाव आहे संजय शरद गांगनाईक. 'समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक'च्या तिकिटावर ते ही निवडणूक लढवत आहेत.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी असलेले श्री. गांगनाईक व्यवसायाने वकील आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या महाराष्ट्र राज्य विभागाचे ते महासचिव आहेत. त्यांचं महत्त्वाचं सार्वजनिक कार्य म्हणजे रेल्वे प्रवाशांचं संघटन  आणि त्यांच्या हक्कांसाठी विविध मागण्यांचा सतत केलेला पाठपुरावा.

तसं पाहिलं तर श्री. गांगनाईक  यांचा जाहीरनामा सुटसुटीत आहे. त्यात भारी आश्वासनं नाहीत. सरकारी योजनांच्या माध्यमातून कोकणभूमीचा विकास आणि पर्यावरण-स्नेही उद्योगांच्या माध्यमातून रोजगार संधी यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.   मतदारसंघाल्या प्रत्येक तालुक्याला दरमहा एकदा भेट देणार आहेत आणि खासदार निधीतून लोकहितासाठी केलेल्याखर्चाचा वेळोवेळी हिशेब देणार आहेत. आणि ही आश्वासनं स्टॅम्प पेपरवर दिल्यामुळे निवडून आल्यावर त्यांची पूर्तता केली नाही तर आपण कायदेशीर कारवाईस पात्र ठरू असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं प्रांजळ प्रतिपादन मान्य करून मतदार आपल्याला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.



कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...