
कवयित्री भामिनीसखा यांचे निधन
मंडणगड येथील डॉ एस एस मसुरकर मेमोरियल ट्रस्टच्या प्रवर्तक आणि कवयित्री भामिनी सखाराम मसुरकर यांचे रविवार दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. भामिनीसखा या नावाने त्या कविता व मुलांसाठी गोष्टी लिहीत. 'कुसुमांजली' या नावाने त्यांच्या काही कविता २०१५ मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनातून बचत करून त्यांनी आपले दिवंगत परोपकारी पती डॉ सखाराम सावळाराम मसुरकर यांच्या स्मरणार्थ ट्रस्ट स्थापन केला होता. त्या माध्यमातून मंडणगड व रत्नागिरी येथे समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. www.drmasurkartrust.webs,com
मंडणगड येथील डॉ चंद्रशेखर मसुरकर, 'मोटार जगत'चे संपादक व ज्येष्ठ स्तंभलेखक राजेंद्रप्रसाद, सुरक्षा अधिकारी मिलिंद, पोलीस अधिकारी शुभेंद्रप्रसाद हे पुत्र ज्येष्ठ परिचारिका सौ विद्या, आशा, मुग्धा आणि सुदर्शन या स्नुषा तसेच निर्मला (प्रतीक्षा ) अरुण कुबल, भारती आणि सौ. उज्ज्वला पराडकर या कन्या व जामात आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment