"कोकण रोजगार हक्क अभियान "कोकणच्या आर्थिक विकासासाठी एक
रचनात्मक अभियान !
कोकण !
येथील निसर्ग समृद्धी , पर्यटन , अमर्याद सागरी संपत्ती , मत्स्य उदयोग , जगातील सर्वात लोकप्रिय हापूस आंबा , काजू , कोकम , नारळ , फलोद्यान , श्रीमंत मसाला पिके , आधुनिक शेती , वनशेती , 48 बंदरे , बंदर आधारित औद्योगिक प्रकल्प , अमाप जल संपत्ती , बुद्धीवान मनुष्यबळ याचे नीट नियोजन केले , विकासाभिमूख धोरणे राबविली ,राज्यात इतर भागांना (सहकार , साखर , कापूस , उस ,द्राक्ष ...)जशा सवलती देतात तशा पर्यटन , मत्स्य उद्योगांना विशेष सवलती , सबसिडी दिल्या , या उद्योगांना प्रोत्साहन दिले तर कोकणातील गावागावात हजारो प्रकल्प उभे राहतील , लक्षावधी रोजगार मिळतील कोकणातील एकाही तरुणाला 10/20 हजारच्या नोकरी साठी मुम्बई पुण्यात जाऊन झोपडपट्टीत रहावे लागणार नाही .
कोकण ! ....
देशातील सर्वात समृद्ध प्रदेश पण परिस्थिती काय ?
80% माणसे मुंबई, पुणे , गोव्यात रोजगारासाठी कष्टप्रद जिवन जगत आहेत , गावात 50% घरे बंद आहेत , गावात तरुण नाहीत , शाळेत मुले नाहीत , वेगाने गावांचे वृद्धाश्रम बनत आहेत .
हे का घडतेय ?
गेली 70 वर्षे कोकणाला एक सापत्न वागणूक मिळतेय ..
शासकीय यंत्रणा आणि व्यवस्था जाणीवपूर्वक कोकणावर अन्याय करत आहे , येथे रोजगार आणि स्वयंरोजगार विकसित होणार नाहीत याची काळजी घेतली जातेय ,
हो ! गेली 20 वर्षे कोकण विकासाची सकारात्मक चळवळ ग्लोबल कोकण , कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवताना याच सातत्याने अनुभव आम्ही घेतोय , म्हणूनच सुरु करीत आहोत कोकणाच्या रचनात्मक विकास चळवळीच्या बरोबरीने एक रचनात्मक संघर्ष अभियान ! "कोकण रोजगार हक्क अभियान "
कोकणावर होणारा अन्याय .....
कोकणात कोणत्याही सरकारी कार्यालयात जा शिक्षक , तालाठी, कृषी , आरोग्य , ग्राम सेवक ...90 % सरकारी कर्मचारी कोकणाबाहेरील आहेत .कोकणातील स्थानिक पदावर कोकणातील युवक निवड होणारा नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते . या कर्मचाऱ्यांचा येथील मातीशी भावनिक संबध नसल्यामुळे तलाठी , ग्रामसेवक ...कधी गावात सापडत नाहीत व ग्रामिण विकासावर याचा वाईट परिणाम होतोय .
स्वतंत्र ssc /hsc बोर्ड झाल्यानंतर गेली 7 वर्शे राज्यात सातत्याने प्रथम येणारे बुद्धीचे माहेरघर कोकण असताना साध्या साध्या पदावर येथील मुलांची निवड होत नाही .
गेली 15/20 वर्शे कोकणात प्रचंड प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढतोय व यातून लाखो रोजगार /व्यवसाय विकसित होऊ शकतील पण हा उदयोग विकसित होऊ नये असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय ,
पर्यटन स्थळांवर साध्या पायाभूत सुविधा (रस्ते , स्वच्छतागृह , पार्किंग ) बेसिक सुविधा नाहीत , याकरिता निधि दिला जात नाही ,
शासनाची मदत न घेता कोकणातील तरुण पर्यटकांसाठी हॉटेल , होम स्टे , रिस्सोर्ट , ...ई प्रकल्प उभारत आहेत पण या तरुणांना पर्यटन उदयोग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा व अनेक कारणे दाखऊन परवानग्या दिल्या जात नाहीत .बँका कर्ज देत नाहीत , घरदार गहाण टाकून येथील तरुणांनी स्वताच्या जागेवर स्वताच्या हिमतीने उभारलेले प्रकल्प बेकायदेशीर ठरऊन दर वर्षी प्रकल्प तोडण्याच्या नोटीस दिल्या जातात .दंड आकारला जातो .
सरकारचे हजारो कोटी वापरून उभारलेला सहकारी साखर उद्योग , अन्य भागातील शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी दिलेल्या हजारो कोटीच्या योजना याउलट स्वकर्तूत्वाने कोकणवासियानि उभारलेला पर्यटन उदयोग मदत न करता अडचणी आणण्याचे काम शासन व्यवस्था कायम करीत असते .
पर्यटनाप्रमाणे हजारो कोटीची अर्थव्यवस्था समुद्र , खाडी , नदी किनारी मत्स्य शेतीतून उभी राहील येथेही परवानग्या दिल्या जात नाहीत , संपूर्ण कोकणात कोळंबी , तीलापीया , जिताडा , खेकडा , ...एकही hachary , सीड आणि फीड मिळण्याची व्य्क्वस्था कोकणात नाही . प्रशिक्षण व्यवस्था नाही
हीच परिस्थिती गेली अनेक वर्षे मत्स्य दुष्काळात असलेल्या कोकणातील कोळी बांधवांची , अतिशय अडचणीत असलेल्या आंबा , काजू , चिकू बागायत दारांची , शेतकऱ्यांची .
एकूणच प्रचंड विकासाची क्षमता आसलेला परंतु उदासिन आणि चाकरमानी मानसिकता असलेला कोकण येथील तरुण , शेतकरी , व्यावसायिक कधीच विकसित होऊ नये असे धोरण गेली 70 वर्षे राबविण्यात येत आहे .
हे सर्व रचनात्मक पद्धतीने कसे विकसित करता येइल यावर गेली 20 वर्शे सातत्याने एक चळवळ ग्लोबल कोकम , कोकम भूमी प्रतिष्ठान , पर्यटन उदयोग संघ , प्रशिक्षण , पर्यटन महोत्सव , जन जागृती यातून आम्ही राबवीत आहोत .
परंतु कोकणावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आता एक रचनात्मक संघर्ष ठरवले आहे , हो विकासाच्या रचनात्मक चळवळीबरोबरच एक प्रदीर्घ रचनात्मक संघर्ष आता आम्ही सुरु करीत आहोत .
कौकणात आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळणे , आमच्या जमिनीवर रोजगार प्रकल्प उभारण्यासाठी सहज परवानग्या मिळणे , रोजगार पूरक धोरणे व इतर प्रदेशांना मीळतात तशा सवलती आणि सबसिडी ......हे सर्व आम्हालाही मिळाले पाहिजे !
कोकणात रोजगार आणि कोकणचा विकास हा आमचा अधिकार आहे !
" कोकण रोजगार हक्कं अभियान "
जय कोकण !
संजय यादवराव , संस्थापक अध्यक्ष
समृद्ध कोकण संघटना !